मॅरेथॉन
विजो (विजय जोशी)
आजही मी धावतोच आहे
आयुष्याची मॅरेथॉन
जीवाच्या आकांताने
अंतिम रेषेच्या दिशेने…
माहित नाही मला
किती पळायचं आहे अजून ?
ड्रीम रन
अर्ध मॅरेथॉन
की
पूर्ण मॅरेथॉन ?
अंतिम रेषा मात्र
सरकते आहे पुढे पुढे…
वाटेत आहेत जागोजागी
परिस्थितीचे अडथळे
सुख-दु:खांचे उतार चढाव
मानापमानाचे थांबे
विरोधकांचे गतिरोधक
आणि
हितचिंतकांच्या शुभेच्छा सुद्धा…
विश्वास आहे माझा
स्वत:वर ठाम,
एका निश्चित ध्येय पुर्तीसाठी
मी धावत राहीन सतत,
अंतिम रेषा गाठून
जिंकेन म्हणतो
ही आयुष्याची मॅरेथॉन…!!
▪️▪️▪️
© विजो (विजय जोशी)